पिंपरी (Pclive7.com):- नुकत्याच पार पडलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग याच्या अंतर्गत वर्ल्ड पॅनक्रेशन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये थेरगावातील अब्दुल अहाद युनूस शेख याने १००+ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा २ मे ते ४ मे दरम्यान उझबेकिस्तान देशातील ताश्कंद येथे पार पडल्या.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230415-WA0028-300x150.jpg)
ही स्पर्धा ग्रैपलिंग अँड पॅनक्रेशन असोसिएशन यांच्या विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्याने शहरातील या खेळाडूचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मागील वर्षी अब्दुल अहाद युनूस शेख हा डॉ. डी. पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्समध्ये बारावी उत्तीर्ण झाला. अब्दुल अहाद युनूस शेख याने यापूर्वी तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून गेली तीन वर्षे तो राष्ट्रीय स्तरावर आपल्या वजनी गटात सुवर्णपदक पटकावत येत आहे.