पिंपरी (Pclive7.com):- पुण्यातील लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. परंपरागत काँग्रेसची ती जागा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगत महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील लोकसभेची निवडणूक लढू आम्हाला महाविकास आघाडीतील पक्ष सहकार्य करतील अशीच आमची मागणी आहे. बैठकीत तशी आम्ही मागणी करणार आहोत. असे देखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “लोकसभा निवडणुका आगामी काळासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. विधानसभा निवडणूक देखील लागते आहे. महानगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे. परंतु, सर्वच पक्षांचे लक्ष हे लोकसभेच्या निवडणुकीकडे आहे. महाविकास आघाडीत कोणाची ताकत जास्त आहे.
यापेक्षा पारंपारिक निवडणूक कोण लढलं यावर चर्चा होते. पुण्यातील कसबा निवडणुकीत सर्वांचं सहकार्य झालं. पुण्यातील जागा काँग्रेसने आतापर्यंत लढवलेली आहे. आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील लोकसभा लढऊ. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही आमची मागणी आहे. बैठकीत तशी विनंती आणि करणार आहोत.”