पिंपरी (Pclive7.com):- रहाटणीतील शिवाजीनगर येथील रॉयल ऑरेंज काऊंटी सोसायटीत दि.९ आणि १० जून २०२३ रोजी बालपणीच्या जुन्या खेळांचा आनंद चिमुरड्यांना लुटला. सोसायटीमध्ये ‘देसी गेम्स’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कंचे(मार्बल्स), लट्टू (भवरा), लगोरी, रुमालपाणी, टिपरी (हॉपस्कॉच), टायर चालवणे, स्लो सायकल, आणि बरेच काही यासारखे खेळ होते. या कार्यक्रमाचा उद्देश बालपणीच्या आठवणींना पुन्हा जोडणे आणि युवा पिढीला मैदानी खेळांचा आनंद अनुभवण्याची संधी प्रदान करणे, सौहार्दाची भावना वाढवणे आणि मोबाईल फोन आणि गॅझेट्सवरील अत्याधिक अवलंबनापासून मुक्त होणे हा होता. सोसायटी मधील नागरिकांनी सुध्दा या खेळांमध्ये सहभाग नोंदवत उत्तुंग प्रतिसाद दिला.
कार्यक्रमामध्ये लहानपणापासूनचे काही आनंददायक पदार्थ राजमलाई, पेप्सीकोला, टॉफी, स्वादिष्ट चॉकलेट्स आणि कायम लक्षात राहणारे बोरकुट सुध्दा उपलब्ध करत या आवडत्या फ्लेवर्सचा सगळ्यांनी एकत्र आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या आयोजक कुणाल बोमनवार, रवी तीबडेवाल, शांतनू दवंडे, प्रणव कुर्थकोर्ती, नितीन गुप्ता, अभिषेक दुआ, प्रियांक गुप्ता, जैनील सेठ, प्रमोद सिंग, मोहित यांनी सर्व सोसायटीवासियांचे सहभागा बद्दल आभार मानले.