पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, नेते मंडळी येणार आहेत. त्यामुळे निगडी तसेच वाकड वाहतूक विभागात वाहतूक सुरळीत असणे गरजेचे आहे. म्हणूनच वाहतूक विभागाच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत.

आज (दि. १६) रोजी दुपारी १२:०० ते रात्री १२.०० पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसा आदेश काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, परि २, अति, कार्य, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड शहर यांनी काढला आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग…
मयुरेश्वर गणपती मंदिर डांगे चौक ते रिव्हर ह्यु चौक, चिंचवडपर्यंत जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर जड / अवजड वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग डांगे चौकातून चिंचवडकडे जाणारे वाहन चालक हे डांगे चौक अंडरपासमधून न जाता सर्व्हिस रोडने डांगे चौकातून डावीकडे ताथवडेगांव मार्गे इच्छित स्थळी जातील. महावीर चौकातुन डांगे चौकाकडे जाणारे वाहने सरळ डांगे चौकाकडे न जाता रिव्हर व्हयु चौकातुन इच्छित स्थळी जातील. त्रिवेणी नगरकडुन व टिळक चौकाकडुन येणारी वाहने भक्ती शक्ती चौकामार्गे रावेतकडे न जाता देहुरोड मार्गे जातील. देहुरोडकडुन भक्ती शक्तीकडे जाणारी जड वाहतुक ही सेंट्रल चौकातून रावेत मार्गे वळविण्यात येत आहे.





















Join Our Whatsapp Group