पिंपरी (Pclive7.com):- श्रीक्षेत्र पिठापुरम (आंध्र प्रदेश) येथून श्रीपाद वल्लभ महासंस्थांमधून श्री दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ यांच्या पादुका व रथयात्रेचे आगमन पुण्यनगरी मावळ येथील गहुंजे गावात रविवार (दि.१८ जून) रोजी होणार असल्याची माहिती निमंत्रक संजीवकुमार शांताराम बोडके यांनी दिली आहे.

संजीवकुमार बोडके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ढोल, बँड, सांस्कृतिक वाद्यांच्या गजरात या रथयात्रेचे गहुंजे गावात शुभ आगमन होणार आहे. दि.१८ रोजी सायंकाळी ७ ते ९ नामस्मरण भजन व महाप्रसाद होणार आहे. तसेच सोमवार (दि.१९ जून) रोजी सकाळी ६ ते ७ काकड आरती, सकाळी ९ वाजता अभिषेक, त्यानंतर १० ते १२ भजन व १२ ते ३ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात महासंस्थांचे पुजारी श्री. सुभाष गुरु, व्यवस्थापक श्री. दास गुरु, श्रीनिवास गुरु हे उपस्थित राहणार आहेत. ही रथयात्रा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी अशा मार्गाने १५ जून ते २४ जून अशी होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या सुवर्ण क्षणाचा लाभ घेऊन श्रीपाद वल्लभांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती निमंत्रक संजीवकुमार बोडके यांनी केले आहे.
Tags: गहुंजे येथे आगमनपादुकारथयात्राश्री क्षेत्र पिठापुरमश्री क्षेत्र पिठापुरम येथून श्रीपाद वल्लभांची रथयात्रा व पादुकांचे रविवारी गहुंजे येथे आगमनश्रीपाद वल्लभ





















Join Our Whatsapp Group