पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात दंत विभागातील एलिगेंट डेंटोकेर विभागाचे उद्घाटन प्रसिध्द सिनेतारका श्रद्धा कपूर हिच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, व्हाईस चेअरमन भाग्यश्री पाटील, दैनिक पुढारीच्या संचालिका आणि कस्तुरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, सचिव सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
थ्री डी सीबीसीटी डेंटल स्कॅन, लहान मुलांची दातांजी काळजी व उपचार, लेझर ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचे ब्रेसेस, दातांचे इंप्लेट, स्माईल डिझाइन, दंत सौदर्यशास्त्र, तोंडाच्या कॅन्सरचे निदान व शस्त्रक्रिया, वेदना रहित रूट कोणाला ट्रीटमेंट आदी सुविधा या सुसज्ज एलिगेंट डेंटोकेर विभागात असणार आहेत.