पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बडनेर गावामध्ये मनोहर कुलकर्णी (भिडे गुरुजी) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुटूंबाबद्दल अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा विरोधात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निषेध करत निदर्शने करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अनुदगार काढणाऱ्या मनोहर कुलकर्णी (भिडे गुरुजी) याना त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, माजी नगरसेवक मारुती भापकर, विश्वास गजरमल, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, महिला अध्यक्षा सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ,