नवी दिल्ली – भाजप खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज लोकसभा अध्यक्षांकडे पटोलेंनी राजीनामा सोपवला.
खासदार नाना पटोले अनेक दिवसांपासून मोदी सरकारच्या भूमिकेवर नाराज होते. पटोले भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील खासदार होते. नाना आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.