पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने संत तुकाराम नगर या ठिकाणी सफाई कर्मचारी बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून हा सण साजरा करण्यात आला. वर्षा जगताप म्हणाल्या की, राखी हे विश्वासाच प्रतिक आहे. हाच विश्वास मनात ठेवून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ज्यांना एकही दिवस सुट्टी नसते आणि स्वताच्या जीवाची पर्वा न करता खरंतर कठिण काळातही दिवसरात्र प्रामाणिकरित्या अविरतपणे जे कार्य करत असतात असे सर्वांचे बंधू सफाई कर्मचारी त्यांच्यासाठी हा आजचा सण त्यांच्या सोबत साजरा करण्यात आला. त्यांचे देखिल समाजात एक महत्वाचे स्थान आहे, हे महत्व पटवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न युवतींनी केला. आजचा रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने संत तुकाराम नगर या ठिकाणी साजरा करण्यात आला.
यावेळी नितीन तुपे सर, विकी भोले, अनिल शिंदे, चंद्रकांत शिंदे, अर्जुन भादवे ह्या सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत व मेहेक इनामदार, मेघना जगताप, वैष्णवी आदी युवतींनी सहभाग घेतला.