पिंपरी (Pclive7.com):-पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे. तळवडे येथे केकवरील वरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात ही आग लागली आहे. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या आगीत आणखी काही कामगार अडकल्याचे म्हटलं जात आहे. तळवडे येथील कारखान्यात ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु असून जखमींना रुग्णालयात हलवले आहे. मृत्यू झालेले सर्व कामगार हे केकवरील वरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते.
या घटनेनंतर काही कालावधीतच महापालिका आयुक्त शेखर सिंह घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, याआगीत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जे जखमी कामगार आहेत त्यांना वायसीएम तसेच ससून रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आलं आहे.