पिंपरी (Pclive7.com):- भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी आज रस्ता रोको करत आंदोलन केले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको केला. चौकात भीमसैनिकांनी ठिय्या मांडला असून चौकातून सर्व मार्गाने येणारी वाहने अडवून निषेध नोंदविण्यात येत आहे. चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी काही प्रमाणात शहरातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.