पिंपरी (Pclive7.com):- काऊडिग्रीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन पुणे यांच्या तर्फे दरवर्षी अतुलनीय समाज कार्याबद्दल विविध शेत्रातील व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी सामाजिक कार्याची दखल घेत सुहास कुदळे यांना समाजरत्न पुरस्कार-२०२३ देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळा मोडक सभागृह शिवाजीनगर पुणे येथे २५ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजक ज्येष्ठ गोभक्त मा. सूर्या पुजारी हे होते. प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण सावंत सर (अध्यक्ष अग्रीकल्चर कॉलेज फार्म को. ऑफ क्रेडिट सो. पुणे), श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज (दादासाहेब पुरस्कार प्राप्त) व शांताराम भोंडवे (चित्रपट निर्माते बांधकाम व्यवसायिक) आदी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.
सुहास साहेबराव कुदळे यांनी सामाजिक काम करत असताना समाजासाठी भरीव असे कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत श्रीकृष्ण सावंत सर यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२३ पुरस्कारासाठी निवड केली. पुणे इथे पार पडलेल्या सोहळ्यात सुहास कुदळे यांनी कुटुंब व मित्र परिवार यांच्या समवेत हा पुरस्कार स्वीकारला.