पिंपरी (Pclive7.com):- च-होली येथील श्रीकृष्ण पुरम गृहरचना सहकारी संस्था मर्या, चोविसावाडी येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महाराजांच्या मुर्तीला जेष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सोसायटीमध्ये चिञकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा तसेच पोवाडे गायनाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये लहान मुले, मुली, महिलांसह पुरुषांनी देखील सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका साधना तापकीर व शहर भाजपाचे कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सोसायटीचे चेअरमन सुधीर कोळी, सल्लागार निलेश शिनगारे, सुनिल इदे, नितेश हिंगनगर यांनी सर्व स्पर्धेचे नियोजन केले. तसेच सोसायटीमधील चेतन धनगड, दत्ताञय लेंडे, गुलाब रावते, सुभाष वराडे, संतोष चौधरी, अनिकेत पाटील, रविंद्र भोळे, बाळासाहेब लांडे, प्रवीण लांडे, संतोष कोळी, योगेश गावडे काळूराम तापकीर, महादेव कसाब, किशोर कटारिया, योगेंद्र शिंदे, नवनाथ शिरसाठ, अशोक साबळे, संदिप डेगळे, प्रकाश गवारे, मंगेश भोईर व निलेश तापकीर संजय इथे व इतर सभासद यांनी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करुन सहकार्य केले. तसेच सर्वांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.