पिंपरी (Pclive7.com):- लिफ्ट मध्ये अडकलेल्या सात जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. पिंपरी येथील मोरवाडी भागात असलेल्या रॉयल रेसिडेन्सी या सोसायटीत काल (दि.१६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पिंपरीतील मोरवाडी येथील रॉयल रेसिडेन्सी या सोसायटीतील लिफ्टमध्ये काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सात व्यक्ती अडकले होते. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे बंद पडली होती. त्यानंतर हनुमंत गुब्याड यांनी ९.११ वाजता अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील अग्निशमन केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, आणि त्यांनी लिफ्ट मध्ये अडकलेल्या सात व्यक्तींची लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली.
सुटका केलेल्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे – १) फयाज (१० वर्ष) कुदळवाडी, २) अंबादास हांडे (६२ वर्ष) जुन्नर, ३)वसंत सातपुते (५७वर्ष) संगमनेर, ४) महादेव सातपुते (६० वर्ष) पुणे, ५) सोन्या सातपुते (५७वर्ष) संगमनेर, ६) जगन्नाथ सातपुते (५४वर्ष) संगमनेर, ७) दिलीप भालके (५७ वर्ष) मोशी.
या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये घटनास्थळी विठ्ठल सफकाळ (लि फा), अमोल चिपळूणकर (D.C.O), चंद्रकांत चव्हाण (T.S.O), विकास कुटे (TF ), महेश इंदलकर (T F), दिपेश दिवेकर (TF ), योगेश ढोले (TF) हे कर्मचारी उपस्थित होते.