पिंपरी (Pclive7.com):- मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्यातील साई मोरेश्वर हाॅटेल समोर आयशर टेम्पो व मारूती रिटझ कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात रिटझ कार मधील ५ जण जागीच ठार झाले तर ३ जण जखमी झाले आहेत. आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर हॉटेल साई मोरेश्वर समोर एका रिट्झ कारला (एम.एच.०४.डी. वाय.६३४६) भरधाव वेगातील आयशर टेम्पो ( एम.एच.०९.बी. सी.८२७८) ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. मृत्यू झालेल्यांची तसेच जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
या अपघातात कार मध्ये बसलेल्या एकूण ७ जणांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये ४ महिलां व एका पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित दोन्ही महिलाही गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.