पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील राहुल पवार टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०९ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ४४ आरोपींवर आतापर्यंत मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे १) राहुल संजय पवार (टोळी प्रमुख) रा. महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे, २) अमर नामदेव शिंदे वय २८ वर्षे रा.मु.पो. कासार आंबोली, ता. मुळशी, जि पुणे, ३) नितीन पोपट तांबे वय ३४ वर्ष, रा. एफ/२०८, स्वदेशा सोसायटी, देहूगाव रोड, मोशी, पुणे, ४) अभिजीत ऊर्फ अभि चिंतामण मराठे रा. जयभवानी नगर कोथरुड पुणे, ५) आसिफ ऊर्फ आशू हैदर हाफशी रा. दत्तु पठारे चाळ, कासारवाडी, पुणे. यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
टोळी प्रमुख राहुल पवार याने त्यांच्या साथीदारांसह हिंसाचाराचा वापर, धमकी देवुन किंवा धाक दाखवुन महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी, पौंड पोलीस स्टेशन हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशिर अग्निशस्त्रे जवळ बाळगल्या प्रकरणी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त), वसंत परदेशी (अपर पोलीस आयुक्त), संदिप डोईफोडे (पोलीस उप-आयुक्त गुन्हे), डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप-आयुक्त परि-०३), बाळासाहेब कोपनर (सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते (महाळुंगे एमआयडीसी पो.स्टे), पोलीस निरीक्षक अनिल देवडे (पी.सी.बी गुन्हे शाखा), तसेच अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पोहवा कोणकेरी (महाळुंगे एमआयडीसी पो.स्टे) यांच्या पथकाने केली आहे.