पिंपरी (Pclive7.com):- भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा पिंपरीतील मोरवाडी चौकात अपघात झाला आहे. काही वेळापूर्वी ही घटना असून, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. परंतु, यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार अचानक समोर आल्याने त्याला वाचविताना ब्रेक लावल्याने हे वाहन उलटले आहे. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने दोन आर्मी जवान हे वाहन घेऊन जात होते. क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला करून अग्निशमन दलाकडून रस्त्यावर पसरलेले ऑईल साफ करण्याचे काम सुरू आहे.
























Join Our Whatsapp Group