१९ राज्यांमध्ये १०२ मतदारसंघांत जय्यत तयारी
# पहिल्या टप्प्यात देशभरात १०२ मतदारसंघांपैकी ७३ खुल्या गटातील तर अनुसूचित जातींसाठी ११ व अनुसूचित जमातींसाठी १८ मतदारसंघ राखीव आहेत.
# अरुणाचल आणि सिक्कीममधील ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होईल.
# मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल.
# पहिल्या टप्प्यातील मतदारांमध्ये ८.४ कोटी पुरुष, ८.२३ कोटी महिला व ११ हजार ३७१ तृतीयपंथीय आहेत.
# ३५.६७ लाख प्रथम मतदार आहेत. २०-२९ वयोगटातील ३.५१ कोटी युवा मतदार आहेत.
# ४१ हेलिकॉप्टर, ८४ विशेष गाडया व सुमारे १ लाख वाहने निवडणूक व सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी तैनात केली आहेत.
तर राज्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज, शुक्रवारी मतदान होत आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे, रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर भंडारा-गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे.