चिंचवड (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या चिंचवडगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनीताई जगताप यांच्या शुभहस्ते आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे आणि ललिताताई चिंचवडे यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी महिला शहराध्यक्षा उज्वलाताई गावडे, ललिता चिंचवडे, हिरामण बोडके, ज्योतीताई भालके, शुभम चिंचवडे, हरिष मोरे, किरण गांधी, पाटीलबुवा चिंचवडे, संजय कलाटे, गणेश गावडे, कमलजित सिंग, प्रमोद नेवे, सागर चिंचवडे, अजित चिंचवडे, गणेश चिंचवडे, अजय गायकवाड, कार्तिक चिंचवडे, पंकज बच्छावत, प्रविण पवार, शांताराम पवार, संग्राम लाड, सागर शितोळे, संतोष पवार, विनायक जगताप, प्रशांत पवार, रामय्या हिरेमठ व मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.