पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित “भीमशक्ती शिवश्क्त्ती” संघटनेकडून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. या बाबत भीमशक्ती शिवश्क्त्ती संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात दलित, बहुजन अल्पसंख्याक जाती जमाती समूहातील सजग मतदार समूह आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. भीमशक्ती शिवश्क्त्ती” संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश देशमुख, उपाध्यक्ष संग्राम भग, पिंपरी चिंचवड शहरअध्यक्ष बाळासाहेब भालेराव, महिला शहराध्यक्ष तमन्ना शेख यांनी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पूर्णपणे पाठींबा जाहीर दिला आहे, त्याबाबत संघटनेने प्रसिद्धीपत्रक दिले आहे. तसेच उमेदवार वाघेरे पाटील यांचे “मशाल” चिन्ह संघटनेच्या माध्यमातून मावळ लोकसभेत घराघरात पोहोचवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.