पिंपरी (Pclive7.com):- निगडीतील भुयारी मार्ग हा दारुड्यांचा अड्डा बनल होता. यावर निर्बंध लागावा म्हणून भुयारी मार्गात व्यापाऱ्यांनी वर्गणी काढून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
निगडी प्रभाग क्र.१३ निगडी गाव या प्रभागात सर्व नागरिकांच्या मागणीनुसार भुयारी मार्ग करण्यात आला. परंतु भुयारी मार्ग झाल्यानंतर याच भुयारी मार्गात रात्री अपरात्री गांजाडी व दारू पिणाऱ्या लोकांनी दारूचा अड्डा बनवला होता. त्यामुळे असंख्य महिला व लहान मुले यांना हा त्रास सहन करावा लागत होता.
या भुयारी मार्गामध्ये दारू पिणारी लोकं लघवी सुद्धा करत होते. त्यामुळे घाणेरडा वास, त्याचप्रमाणे दारूच्या बाटल्या, गुटखा खाणारी लोक त्यांचा त्रास वाढत होता. महिला वर्गाची सतत मागणी होती एवढा छान भुयारी मार्ग झाल्यानंतर या लोकांमुळे आम्हाला त्रास होत आहे तुम्ही यावर काहीतरी उपाययोजना करा.
याठिकाणी महापालिकेच्या वतीने सुरक्षा रक्षक नेमण्यात आला. त्याच प्रमाणे निगडी येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन या भुयारी मार्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार कमी झालेला आहे. या कामासाठी पुढाकार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, स्थानिक नगरसेवक मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व निगडीतील सर्व व्यापारी वर्ग यांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. निगडी येथील सर्व व्यापारी वर्गाचे सचिन चिखले व रोहिदास शिवणेकर यांनी आभार मानलेले आहेत.
























Join Our Whatsapp Group