पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडांगणामध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि योगांजली स्टुडिओ रहाटणी यांच्या वतीने सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी योग प्रशिक्षक अंजली खोकले आणि मीनल साताळकर यांनी मंत्रोच्चारणासह सूर्यनमस्कार सत्राचे नेतृत्व केले. उपस्थितांना अवंतिका पाटील आणि धनश्री कर्डीले यांच्या प्रात्यक्षिकांद्वारे सूर्यनमस्कार शिकवण्यात आले.
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे, मनोज ब्राह्मणकर, दीपक गांगुर्डे आदी उपस्थित होते. जयश्री दाभाडे, रेणुका पासळकर आणि रेखा तोडकर यांनी सूत्रसंचालन केले.





















Join Our Whatsapp Group