पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड मधील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी ठामपणे आवाज उठवला. परिसरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

प्रभाग २६ मधील कचरा संकलनाची व्यवस्था, कचऱ्याची योग्य प्रक्रिया तसेच व्यवस्थापन करताना येणाऱ्या अडचणी या विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम होत असल्याची बाबही स्नेहा कलाटे यांनी निदर्शनास आणून दिली.
या समस्येवर तात्पुरते नव्हे तर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचेही कलाटे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रभागातील स्वच्छता आणि पर्यावरण टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जाईल आणि लवकरच या विषयावर योग्य निर्णय होईल, असा विश्वास नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी व्यक्त केला.
Tags: Sneha Kalate


















Join Our Whatsapp Group