पिंपरी (Pclive7.com):: पिंपरी चिंचवड शहरात अन्न-धान्य पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला आहे. कासारवाडी येथे दोन टेम्पोमधून 57 भरलेले आणि 207 रिकामे भारत गॅसचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न-धान्य पुरवठा विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारे कासारवाडी येथे छापा टाकला. यावेळी दोन टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर आढळून आले. तसेच टेम्पोच्या बाजूला गॅसचे सीलही सापडल्यामुळे या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅसमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जप्त केलेले सिलेंडर आणि टेम्पो ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास अन्न-धान्य पुरवठा विभागाकडून सुरू आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न-धान्य पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विजय कुमार क्षीरसागर यांनी दिली आहे.


















Join Our Whatsapp Group