पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (दि.१३) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

सभेला येताना बनसोडे यांनी गळ्यात नकली नोटांचा हार घातला होता. शहरात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ त्यांनी हा हार प्रशासनाला भेट देत जोरदार टीका केली. “महापालिकेत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मागे राहिलेल्या चोरांना आवर घाला. जर पैसेच हवेत तर हा हार घ्या,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले.
यावेळी बनसोडे यांनी तत्कालीन आयुक्तांवरही निशाणा साधत प्रशासनाने भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
राजू बनसोडे यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासन काही काळ अनुत्तरित झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुढील काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















Join Our Whatsapp Group