पिंपरी (Pclive7.com):- उद्धवश्री पुरस्कार सोहळा समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘उद्धवश्री पुरस्काराने’ झी २४ तासचे प्रतिनिधी कैलास पुरी यांना सन्मानित करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करण्याऱ्या मान्यवरांना देखील यावेळी उध्दवश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, शिवसेना संघटक गोविंद घोळवे, पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सुनिल कदम, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, उध्दवश्री पुरस्कार समितीचे निमंत्रक इरफान सय्यद, अध्यक्ष माधव मुळे, सचिव गुलाब गरूड, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, माधव मुळे, आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ हे गेली पंधरा वर्षे याचे आयोजन करत होते. यंदाच्या वर्षी बाळासाहेब लांडगे (क्रिडा), गोपाळ देवांग (क्रिडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दिप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब कऱ्हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रिडा), कैलास पुरी (झी २४ तास वार्ताहार), भूषण तोष्णीवाल (अंध सनदी लेखपाल), डी. एम. खुणे (सनदी लेखपाल), गोविंद दाभाडे (संस्थापक, सरस्वती शिक्षण संस्था), मिलींद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबनराव कांबळे (दै. सम्राट संपादक), या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या या मान्यवरांना मिळालेला उध्दवश्री पुरस्कार हा खरोखरच मोठा पुरास्कार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करत होते. त्यांची परंपरा उध्दव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे. दिवंगत जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ हे झपाटलेले कार्यकर्ते होते. निष्ठने त्यांनी शिवसेनेचे कार्य केले. त्यांच्यानंतरही या पुरस्काराचे कार्य सुरू ठेवले हीच खरी त्यांना श्रध्दांजली आहे. सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन देसाई यांनी यावेळी केले.
आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, गेली १५ वर्षे दिवंगत जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ या पुरस्कार कार्यक्रम आयोजिन करत होते. मात्र काही महिन्यापूर्वी त्यांचे दुख:द निधन झाले. परंतू आम्ही या पुरस्काराची परंपरा बंद पडू द्यायचा नाही असे ठरवले. त्यानुसार सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन हा पुरस्कार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब गरूड यांनी केले.






















Join Our Whatsapp Group