पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज पवन शाह याची आज १९ वर्षाखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
१९ वर्षाखालील चौरंगी क्रिकेट मालिकेच्या भारत ‘अ’ संघ व आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये नुकत्याच श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या सामन्यातच विक्रम नोंदविलेल्या पवन शाह याची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
इंग्लड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या चौथ्या व पाचव्या कसोटी सामन्याकरीता पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचे कर्णधारपद रिक्त झाले. श्रीलंका दौऱ्यावरील १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात पवन शाहने जोरदार कामगिरी केली. याची दखल निवड समितीने घेत आज त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.






















Join Our Whatsapp Group