
या दौऱ्यादरम्यान पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विशेष ‘संवाद सत्र’ही आयोजित करण्यात आले असून, यात स्थानिक पदाधिकारी आणि मनसैनिकांशी चर्चा होणार आहे.

हा मेळावा रविवारी सकाळी ११ वाजता पिंपरीतील मोरवाडी येथील ‘हॉटेल घरोंदा’ येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाला मनसेचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अविनाश अभ्यंकर आणि अमय खोपकर यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. तसेच, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group