पिंपरी (Pclive7.com):- अम्युचर सवाते असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ९ वी राष्ट्रीय सावते स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. देहूनगरीत प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, शुक्रवार (दि.२०) ते रविवार (दि. २२ नोव्हेंबर २०२६) या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे.

देहू येथील सरस्वती लॉन्स येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील विविध राज्यांतील खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे यांच्यासह पिंपरी चिंचवड चे महापौर रवीभाऊ लांडगे देहूच्या नगराध्यक्षा स्मिताताई चव्हाण उपनगराध्यक्ष योगेशभाऊ काळोखे तसेच सर्व सन्मानीय नगरसेवक व विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

सवाते या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणे, खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे आणि या खेळाचा प्रसार करणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. अम्युचर सावते असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव सुहास धाईंजे व सर्व आयोजक समितीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group