
पिंपरी (Pclive7.com):- दरवाजा उघडा ठेवून भरधाव पीएमपी बसच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने महिला प्रवासी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवार (दि. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिराजवळ घडली. याप्रकरणी जखमी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चालक बसचा दरवाजा उघडा ठेवून भरधाव वेगात वाहन चालवत होता. प्रवासादरम्यान चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने महिलेचा तोल गेला. त्या उघड्या दरवाजातून रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताच्या खुब्याला, डोक्याच्या मागील बाजूस आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. दिघी पोलिस तपास करत आहेत.



















Join Our Whatsapp Group