
२८ ऑक्टोबर २०२७ अंतिम तारीख
त्यांना या नव्या नियमांनूसार सोयी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये या लिफ्टना सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित बचाव उपकरणे ओव्हरलोड प्रोटेक्शन डिव्हाइस म्हणजेच अतिभार संरक्षण उपकरणे बसवून देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्याची तारीख ही २८ ऑक्टोबर २०२७ अशी देण्यात आली.

प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय लिफ्ट वापरण्यास बंदी
लिफ्ट अपघाताच्या अनेक घटना या घडत असात. अनेक लिफ्ट अपघातानंतर हे नवे नियम अधिसूचित करण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्ते राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची सुरक्षा महत्त्वाच्या स्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा मंजूर झाल्यानंतर नऊ वर्षांनी हे नियम लागू करण्यात येणार आहे.यामध्ये देखील दोन नियम करण्यात आले आहेत त्यामध्ये ज्या मुलांचे वय हे १२ वर्षाखालील असेल त्यांना प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय लिफ्ट वापरण्यास बंदी आहे.तर लिफ्ट वापरणारी व्यक्ती ही १८ वर्षे असणे आवश्यक आहे.



















Join Our Whatsapp Group