पिंपरी (Pclive7.com):- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) महाविद्यालयाच्या वतीने ‘दीपोत्सव’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. अॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागांतर्गत एफईएसए आणि लाईफ स्किल्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील आणि हाताने रंगवलेले दिवे तयार केले. या वस्तूंची विक्री करून जमा झालेला निधी पिंपरी-चिंचवड येथील संत मोणी बाबा अनाथ आश्रम आणि झुंज दिव्यांग संस्थेला दिवाळी भेट म्हणून देण्यात आला.

याशिवाय महाविद्यालयाच्या वतीने आश्रमाला धान्य, किराणा साहित्य, मिठाई आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आश्रमातील मुलांसोबत विविध खेळ खेळत दिवाळीचा आनंद साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आनंद वाटण्याचा आणि गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमात पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, प्रा. वैशाली निंबाळकर, प्रा. रूपाली पाटील, प्रा. गजानन जाधव, प्रा. राजेश पाटील यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ तावरे, संस्कृती बिरादार, निमिष कदम, सार्थक आटोळे, कुणाल तायडे, अथिला पाटील, संजना गाडगे आणि समृद्धी लांडे यांनी सहभाग घेतला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


















Join Our Whatsapp Group