पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा देण्यासाठी मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आधुनिक, सुसज्ज आणि आकर्षक स्वरूपात सज्ज झालेल्या या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उद्या, रविवार (दि. १५ नोव्हेंबर) रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र (दादा) चव्हाण यांच्या शुभहस्ते या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

मोरवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याला पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि भाजपप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले आहे.

नूतनीकरणानंतर नव्या रूपात सज्ज झालेल्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपच्या शहर संघटनात्मक कामकाजाला नवी ऊर्जा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उद्घाटन कार्यक्रम :
दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ८.३० वाजता
उद्घाटक : रवींद्र (दादा) चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप
स्थळ : भाजप पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी
आयोजक : शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजप पिंपरी
-चिंचवड शहर जिल्हा


















Join Our Whatsapp Group