पिंपरी (Pclive7.com):- विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘छायागीत’ हा नव्या जुन्या गाजलेल्या हिंदी मराठी गीतांचा विशेष कार्यक्रम रविवारी (१५ नोव्हेंबर) सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा तृप्ती कांबळे, दिशा सोशल फाऊंडेशन अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक सचिन साठे, राजेश सावंत, महेंद्र चिंचवडे, साहित्यिक अनिल दीक्षित, कॉसमॉस बँकेचे संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव, शरद शेजवळ, राणू कदम, राजेंद्र देसाई, रवींद्र लांडगे, घमाजी लांडगे, प्रकाश कानडे, प्रकाश गायकवाड, गणेश पठारे, संदीप शिर्के, नरेंद्र मोहिते, उद्योजक रामदास यादव, सुरेश साठे, सुजाता सुतार, खंडू ववले आदी उपस्थित होते.

विनायक कदम यांनी ‘छायागीत’या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती. या मैफलीत मीरा शिंदे, सुजाता माळवे, पूनम झांबरे, जहांगीर पठाण, सूर्यकांत ताम्हाणे, डॉ. कविता बोंडे, स्मिता गायकवाड, शैलेंद्र पाटील, स्वाती पाटील, डॉ. आरोही पाटे, नेहा गायकवाड, सतीश कापडी, शीलरतन बंगाळे, डॉ. संदीप गायकवाड, सुधाकर बाविस्कर, विजय सांबारे, राजू शिरसाट, दामोदर घनतोडे, डॉ. किशोर वराडे, राजेंद्र पगारे, अनिल जंगम, बळवंत कणसे, प्रतिभा ताटकर, छाया घुले पाटील, नंदकुमार कांबळे आणि विनायक कदम या गायक कलाकारांनी सादर केलेल्या एकल व युगल गीतांना रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी गीतांसह दादा कोंडके, सुरेश वाडकर यांची लोकप्रिय गीते आणि डिस्कोच्या ठेक्यावरील उडत्या चालींच्या गाण्यांमुळे विशेष रंगत आली.

नंदकुमार कांबळे यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. संयोजनात आकाश गाजूल, सौमिल घावटे, शैलेश घावटे, छाया घुले पाटील, सचिन शेटे, अनिल जंगम यांनी सहभाग घेतला.


















Join Our Whatsapp Group