पिंपरी (Pclive7.com):- जुन्नर तालुक्यातील लोहकरवाडी येथील गरजू कुटुंबांना मदत पोहोचवण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सौ. अर्चना अक्षय करांडे यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवडच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत त्यांनी लोहकरवाडीसाठी सहभाग घेतला आहे.

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमात सहभागी होताना आम्ही जुन्नर तालुक्यातील लोहकरवाडीची निवड केली. गावातील गरजू कुटुंबांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधी म्हणून गरजेच्या वेळी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, ही आमची जबाबदारी आहे.”
– अर्चना करांडे, नगरसेविका तथा अध्यक्षा, अ-प्रभाग, पिंपरी-चिंचवड.


















Join Our Whatsapp Group