पिंपरी (Pclive7.com):- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर पिंपरी चिंचवड शहरात झळकू लागले आहेत. पिंपरी चिंचवडमधील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी अभिनंदनाचे फ्लेक्स लावून जल्लोषाला सुरुवात केली आहे.

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर समर्थकांकडून आधीच अभिनंदनाचे बॅनर लावले जात असून, निकालापूर्वीच विजय साजरा करण्याची घाई दिसून येत आहे.

दरम्यान, अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच असे बॅनर झळकल्यामुळे यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसत आहे.





















Join Our Whatsapp Group