पुणे (Pclive7.com):- ओम् नमस्ते गणपतये, ओम गं गणपतये नम:, मोरया रे बाप्पा मोरया रे या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण केले. यानिमित्ताने पुणेकरांनी स्त्री शक्तीचा जागर अनुभवला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
ॠषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या संयुक्त विद्यमानाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. हे या सोहळ्याचे १२६ वे वर्ष होते. सोहळ्यात गणेश नामाचा जयघोष करत हजारो महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. ३२ वर्षांपूर्वी केवळ १०१ महिलांनी सुरू केलेल्या उपक्रमात आज २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.