पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी शहरभर आयोजित करण्यात आलेल्या ‘घोंगडी बैठका’ (टप्पा-२) उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडत असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना उपनेते श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका आयोजित करण्यात येत आहेत.

पहिली बैठक आकुर्डी येथील दत्तवाडी परिसरात पाटील हॉस्पिटलसमोर पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश फलके, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, युवासेना शहर प्रमुख चेतन बेंद्रे, युवासेना सहसंपर्क प्रमुख राजीव मेनन, युवासेना शहर प्रमुख श्वेता कापसे, केदार चासकर, योगिता काळे, सुनील कानसकर, दिनेश काशीद, आझाद पठाण, सुभाष चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर दुसरी बैठक पिंपरी येथील मिलिंदनगर परिसरात पार पडली. या बैठकीस राजेश फलके, सागर पाचारणे, चेतन बेंद्रे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, राजीव मेनन, श्वेता कापसे, केदार चासकर, अश्विनी जाधव, सुवर्णा तडसरे, आशिष जाधव, सोमनाथ बेंद्रे, रंजना काळे, वर्षा उजागरे, लता गायकवाड, कोमल गायकवाड, ललिता पवार, तुकाराम उजागरे, विमल कुलबुर्गी, सुनीता रणपिसे, शकुंतला सोनवणे, गोपाळ तेलंग, आसिफा शेख, मनीषा गायकवाड, पल्लवी जाधव, सिद्धार्थ गायकवाड, सुरज खरात, निर्मला सरदार, विशाल गायकवाड, सॅमसन काळे, सोनू सोनवणे, संगीता कडू, अमीना शेख, कशीमा पठाण, रफिक शेख, लोचना यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान नागरिकांनी परिसरातील विविध समस्या, अडीअडचणी तसेच विकासकामांबाबतच्या मागण्या मांडल्या. स्थानिक पातळीवरील प्रलंबित कामे, विकासकामांची सद्यस्थिती आणि नागरिकांच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “घोंगडी बैठकींच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेचा विचार, संवाद आणि जनसेवेचा संकल्प पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.” तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, त्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. शहरातील विविध भागांत अशा बैठका पुढील काळातही आयोजित करण्यात येणार असून, त्यातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group