पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने “शिवस्फुर्ती” दुचाकी रॅली काढून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

“शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणाच युवकांना जीवनातील संकटावर मात करण्याची व अशक्याला शक्य करण्याची शिकवण देत कायम यश संपादन करण्याची स्फूर्ती देईल” असे सांगत युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी शिवअभिवादनातून युवकांना शिवप्रेरणा व शिवस्फूर्ती मिळावी म्हणून या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.
पिंपरी चौकातून निघालेल्या या रॅलीने प्रथम एच ए कंपनी जवळील शिवस्मारकास अभिवादन केले. महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरूवात केली. नतंर पिंपरीगावातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन घोषणा देत उत्साहाने कार्यकर्ते लांडेवाडी चौकाकडे आले. तेथे रायगडाच्या दरवाज्याच्या प्रतिकृती समोरील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानतंर दापोडी येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. १०० दुचाकीस्वार यामध्ये सहभागी झाले होते.
रॅलीचे नेतृत्व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी विजय ओव्हाळ, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करण गील, अनिकेत अरकडे, गौरव चौधरी, रोहीत तिकोणे, फारूक खान, अनिल सोनकांबळे, बाळासाहेब डावरगावे, सैज्जाद चौधरी, सौनू शेख, अदित्य खराडे, सोहेल शेख, राहूल पवार, शुभम शिंदे, पांडूरंग वीर आदि पदाधिकाऱ्यांसमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.





















Join Our Whatsapp Group