पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड गेला आहे. त्याच्याकडून ५ गुन्ह्यांची कबुली देण्यात आली असून ५ लाख १३ हजार ६४५ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखा, युनिट २ च्या पथकाने ही कामगिरी करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सुनिल मल्हारी तलवारे (वय २८, रा. रेल्वे स्टेशनजवळ, कान्हे फाटा, वडगाव मावळ) असे या आरोपीचं नाव अाहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार सुनिल तलवार हा त्याच्या पत्नीसह कान्हेफाटा येथे भाड्याच्या खोलीत रहात असल्याची माहिती पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कान्हेफाटा येथे सापळा रचून सुनिल याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला गुन्हे शाखा युनिट दोन येथे आणण्यात आले. तेथे त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगवी, वाकड आणि वडगाव मावळ परिसरात ५ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ५ लाख १३ हजार ६४५ रूपये किंमतीचे १५५.६५ ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी लक्ष्मण आढारी, नारायण जाधव, प्रविण दळे, संजय गवारे, हजरत पठाण, मोहम्मद गौस नदाफ, फारूक मुल्ला, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, तुषार शेटे, नितीन बहिरट, मयुर वाडकर, राहुल खारगे, किरण आरूटे, धर्मराज आवटे, धनराज किरनाळे, चेतन मुंडे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group