पिंपरी (Pclive7.com):- राज्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व भाजपा महायुतीच्या सर्व आधिकृत उमेदवारांना शिवशाही व्यापारी संघाने जाहीर पाठींबा दिला आहे. याबाबतचे पत्र शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले आहे.
शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, महिला आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षा सुनिताताई खंडाळकर, उपाध्यक्षा भाग्यश्रीताई म्हस्के, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उध्दव ठाकरे यांना जाहिर पाठींब्याचे पत्र देण्यात आले.
शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने देण्यात आलेल्या पाठींबा पत्रात म्हटले आहे की, प्रामुख्याने मावळ लोकसभेवरती पुन्हा भगवा झेंडा फडकविण्यासाठी, मावळगड राखण्यासाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात भगवा झेंडा डौलाने फडकविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मी बहुजन समाजातील मातंग समाजातल्या वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नम्र शिपाई आसल्याने भविष्यात आपल्या मार्गदर्शनाखाली अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांचे नेतृत्व करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदार संघातुन तयारी करत आहे.
शिवशाही व्यापारीसंघाच्या माध्यमातून व्यापारीवर्गाच्या व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी शिवसेना वाढविण्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द राहणार आहोत. असा विश्वास व वचन शिवसेना उपनेत्या आमदार निलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव आनिल देसाई, मिलींदजी नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांना देत आहोत.






















Join Our Whatsapp Group