पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारीणी जाहिर
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 ची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या जयंती सोहळ्यासाठी नगरसेविका आशाताई शेंडगे आणि माजी नगरसेवक राजू दुर्गे व समाजातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मान्यतेने ज्येष्ठ नागरिकांचा व युवा कार्यकर्त्यांचा समन्वय साधून 2019 ची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
अध्यक्ष अशोकभाऊ खरात, उपाध्यक्ष अभिजित शेंडगे, कार्याध्यक्ष महावीर काळे, खजिनदार दत्ता मोसलगी, सरचिटणीस सुनील बनसोडे, चिटणीस गणेश पाडोळे, कार्यकारीणी सदस्य यशोदा नायकवडी, पै. काळूराम कवितके, पै. विठ्ठल सरेकर, संतोष पांढरे, राहुल मदने, मार्गदर्शक दादासाहेब देवकाते, नामदेव सोनवलकर, अभिमन्यू गाडेकर, नागेश तितर, लक्ष्मण रूपनर, सुर्यकांत गोफणे, बजरंग गडदे, बाळासाहेब वाघमोडे, महादेव कवितके, माणिकराव बारगळ, मधुकर लंबाते, भारत नाना कोकरे, शिवाजी बिटके यांची निवड करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group