पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना निगडी, सेक्टर क्रमांक २२ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपने पाठिंबा जाहीर केला आहे. भोसरी मतदारसंघ गुन्हेगारी, दहशत व भयमुक्त होण्याची गरज आहे. तसेच मतदारसंघातील प्रत्येक कामांत होणारा भ्रष्टाचार संपविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील छोट्या-मोठ्या उद्योजकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या खंडणीखोरीला कायमचा आळा बसावा आणि समाविष्ट गावांमधील उरल्यासुरल्या जमिनी वाचाव्यात यासाठी विलास लांडे यांना पाठिंबा दिल्याचे ग्रुपचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी सांगितले. मतदारसंघातील सर्व मागासवर्गीय घटकांनी विलास लांडे यांना लाखांच्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भोसरी विधानसभा मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कष्टकरी आणि कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र मतदारसंघातील मतदारांनी पाच वर्षापूर्वी चुकीच्या प्रवृत्तींना संधी दिली. सत्ता आणि पदे आल्यानंतर या प्रवृत्तींनी संपूर्ण मतदारसंघात अक्षरशः नंगानाच चालविला आहे. मतदारसंघातील नागरिकांना सोशल मीडियावर खिळवून ठेवत या प्रवृत्तींनी प्रत्यक्षात आतून लुटीचा कारभार सुरू ठेवला आहे. मतदारसंघात प्रत्येक विकासकामांत यांचीच भागीदारी आणि वरून टक्केवारी असा कारभार सुरू आहे. प्रत्येक विकासकामांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. काही प्रकल्पांना मंजुरी दिली, पण भागीदारीचा हिस्सा लवकर ठरत नसल्याने मंजुरीनंतर भूमीपूजनाला एक-एक वर्षांचा कालावधी लागला आहे.






















Join Our Whatsapp Group