पिंपरी (Pclive7.com मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन शहरात मुस्लीम बांधवांच्या वतीने ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.
मोहम्मद पैगंबर यांनी या जगाला शांती आणि आणि मानवता याचा संदेश दिला. यामुळे आजच्या दिवशी नमाज पठण करून त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी या जगापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. त्यांची आठवण करून त्यांनी दिलेली जी शिकवण आहे. ती अंगीकरण करण्याचा प्रयत्न करावा आणि जगात शांती आणि सुव्यवस्था नांदावी या करिता सर्वांनी दुवा करून हा ईद ए मिलाद साजरा करावा हीच ईश्वर चरणी सर्व प्रार्थना करतात. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांच्या उपस्तिथीत केजीएन ग्रुप (डीलक्स चौक) वतीने सामुहिकरित्या अन्नदान करण्यात आले. यावेळी अल्लाबक्ष शेख, कौसर सय्यद, शम्मी पठाण, आलीम शेख, आसिफ मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.