पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल यांनी या निवडणूक प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजू बनसोडे आणि भाजपाचे तुषार हिंगे यांच्यात लढत होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group