पुणे (Pclive7.com):- पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जातअसलेली शिवनेरी बस शिंदेवाडी येथील दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली आहे. सोमवारी दुपारी काही तासापुर्वी हा प्रकार घडला असून, मदतीसाठी पोलीस आणि अग्निशमन दल रवाना झाले आहे. या अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त हाती लागत आहेत. दरम्यान, नेमकी बस कोणत्या स्थानकाची आहे, हे समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सांगली जाणारी बस शिंदेवाडी येथील ५० फूट दरीत कोसळी आहे. सोबत ४० प्रवासी त्यावेळी कात्रजनंतर शिंदेवाडी जवळ आल्यानंतर येथील ५० फूट दरीत कोसळली आहे. यात प्रवाशी जखमी झाले आहेत. बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक जमा झाले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.