पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने श्री पांडुरंगाच्या चरणी १० किलो वजनाचे चांदीचे मखर अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे आयोजक आणि सावता सेवक ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ कुदळे व माजी नगरसेवक संतोष कुदळे यांनी दिली.
शनिवारी (दि.१४ डिसेंबर) सोहळ्याच्या समाप्ती आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमादिवशी नगरसेवक वाघेरे यांच्या हस्ते ही चांदीची मखर अर्पण केली जाणार आहे.
दरम्यान, या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प अमोल महाराज बडाख, नेवासा (८ डिसेंबर),ह.भ.प अण्णासाहेब बोधले, डिस्कळ (९ डिसेंबर), ह.भ.प नंदकिशोर खरात, नेवासा (१० डिसेंबर), ह.भ.प सोमनाथ महाराज पाटील, आळंदी (११ डिसेंबर), ह.भ.प सौ. संगीता चोपडे, घाटकोपर (१२ डिसेंबर),ह.भ.प ऍड. शंकर महाराज शेवाळे, मंचर (१३ डिसेंबर) या महाराजांचे किर्तन होणार असून शनिवारी (१४ डिसेंबर) ह.भ.प गणेश महाराज शिंदे हे काल्याचे किर्तन करणार आहेत.
दरम्यान, पिंपरी तसेच आसपासच्या परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सदर पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.