पिंपरी (Pclive7.com):- “झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा” जन्मजात आणि ज्वलंत देशभक्त, सुधारक, साहित्यिक, कवी, नाटककार, इतिहासकार, राजकारणी आणि दार्शनिक अशा विविध पैलूंनी बनलेले व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पिंपरी चिंचवड जिल्हा व समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने लोकमान्य टिळक स्मारक समोर, मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ निगडी येथे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी “मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून खरच हे गांधी आहेत की राहुल खान स्वतःला माहीत नसणाऱ्या या राहुल गांधींना असे बोलणं शोभत नाही” असे मत विहिंप जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार यांनी व्यक्त केले. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या.
नागरिकत्व सुधारणा विधायकेला विरोध म्हणून देशभरात निदर्शने करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांच्या विरोधात योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी विहिंप चिंचवड विभाग संयोजक संदेशजी भेगडे यांनी केली. “शिवाजी महाराजांना चोर लुटारू म्हणणारे गांधी, नेहरू परिवाराला सावरकर हे शिवभक्त व हिंदुत्ववादी होते तसेच त्यांनी शिवाजी महाराजांवर आरती लिहिली होती, धर्मांतरित झालेल्या अनेक हिंदूंची त्यांनी घरवापसी केली हाच राग सदैव नेहरूंचा मनात होता. आणि त्याचीच शृंखला राहुल गांधी यांनी चालवली आहे. गांधी परिवार हा सदैव हिंदू विरोधीच राहिला आहे” असे नितीन वाटकर म्हणाले. यावेळी अनेक संघटनांच्या मान्यवरांनी निषेध व्यक्त करताना राहुल गांधी यांनी बेताल वक्तव्य करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल राहुल गांधींनी भारतीय जनतेची जाहिर मागावी अशी मागणी केली आहे.
राहुल गांधी यांचे निषेध व्यक्त करण्याकरिता विहिंप जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, चिंचवड विभाग संयोजक संदेशजी भेगडे, जिल्हा मंत्री नितिनजी वाटकर, बजरंग दल, जिल्हा संयोजक नानाभाऊ सावंत, जिल्हा सह संयोजक जिल्हा सहमंत्री संभाजी बालघरे, सागर चव्हाण, अभिजित शिंदे तसेच योगेश सासवडे, कृष्णा वाघमारे, महेश बालघरे, अमित भेगडे, प्रशांत मोरे, शिवाजी अंबिके, मुकुंद चव्हाण, श्रीराम परदेशी आणि विहिंप, बजरंग दल, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अशी अधिकृत माहिती जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.