
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर व कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार रघुनाथ हिंगे यांचा उद्या गुरूवारी दि.९ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरंभ सोशल फाऊंडेशन व लोकमान्य ऑर्थोपेडिक्स यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवारी दि.९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रोटरी क्लब, थरमॅक्स चौक, संभाजीनगर याठिकाणी ज्येष्ठांसाठी सवलत कार्ड वाटप करणेत येणार आहे. तसेच कार्डधारक ज्येष्ठ नागरीकांची लोकमान्य ऑर्थोपेडिक्स यांच्यातर्फे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि मणक्याचे विकार यांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठी पहिली तपासणी मोफत, ओपीडीसाठी २० टक्के सवलत, उपलब्ध निदान तपासणीवर २० टक्के सवलत, सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया, अँडमिशनवर १५ टक्केसवलत अशा प्रकारच्या सवलती देण्यात येणार आहे. या सवलतीचा दि.८ जानेवारी २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत कार्डधारकांना लाभ घेता येणार आहे.
उपमहापौरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरूवारी दि.९ रोजी सकाळी १०.३० वाजता रामनगर येथे घरकुल वसाहत, चिखली ते कृष्णानगर कॉर्नर, महाबळी चौक, एच.डी.एफ.सी., रामनगर मार्गे वाय.सी.एम.हॉस्पीटल अशी बससेवा सुरू करणेत येणार अाहे.
त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी आरोग्यदायी योजना हेल्थमंत्र या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य ऑर्थोपेडिक्स व आरंभ सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने खेळांडूच्या आरोग्यदायी भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्पोटर्स मेडिसीन तज्ञ-डॉ.भुषण गणवीर यांचे दुपारी ४ वाजता रोटरी क्लब, थरमॅक्स चौक, संभाजीनगर या ठिकाणी व्याख्यान ठेवण्यात आलेले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ शहरातील खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन आरंभ सोशल फाऊंडेशन व लोकमान्य ऑर्थोपेडिक्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group