पिंपरी (Pclive7.com):- हरियाना येथे झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघात पिंपरी चिंचवड शहरातील ऋषिकेश बारणे, रोहित हाडके व आदित्य एकशिंगे यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
क्रिकेटचे किट भेट देऊन तुषार हिंगे यांनी त्या तिन्ही खेळाडूंचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांना दिला. तसेच, संघाचे प्रशिक्षक राजू कोतवाल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, खेळाडू दत्तक योजना प्रमुख विश्वास गेंगजे आदी उपस्थित होते.
रोहित हाडके हा संत तुकारामनगर येथील पंडित दिनदयाळ उपाध्याय माध्यमिक विद्यालयाचा माजी खेळाडू आहे. तर, ऋषिकेश बारणे खेळाडू दत्तक योजनेतील खेळाडू आहे.






















Join Our Whatsapp Group